आयुष्याची नवीन सुरुवात...
रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-04 15:59:28
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या लग्नाची चर्चा सध्या टीव्ही मालिका विश्वात आहे. रेश्माने तिच्या या लग्नाचे सुंदर फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हळदी समारंभ, सप्तपदी, वरमाला, कानपिळी अशा विविध विधींचे फोटो रेश्माने शेअर केले आहेत. ‘आयुष्याची नवीन सुरुवात’ असे सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
रेश्माने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा वन पीस घातला होता. पवननेदेखील पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. यावेळी स्नेहीजणांनी दोघांवर फुलांचा वर्षाव केला, तसेच हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली. लग्नासारख्या खास क्षणांसाठी रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी घातली हाेती. तर पवनने क्रीम कलरचा धोती कुर्ता घातला होता. रेश्माने शेअर केलेल्या फोटोजवर तिच्या सहकलाकारांसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, रेश्माने हे लग्न महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य अशा दोनही पद्धतींनी लावले. यावेळी सोनेरी रंगाला दोघांनी पसंती दिली होती. वरमाला घालताना रेश्मा प्रचंड भावुक झाली होती. कारण तिचे हे दुसरे लग्न होते. वरमाला घालताच तिने पवनला गच्च मिठी मारली, वरमाला घालून झाल्यावर त्याची दृष्टही काढली. रेश्माने एका रिसोर्टवर हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मोजके मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकलाकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.