आमदारांचे आणि जनतेचे आभार
एक है तो सेफ है ; देवेंद्र फडणवीस यांनी दिला नारा
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-04 16:18:07
मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिलं. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानायला विसरले नाही. एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो , असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.