२५ वर्षांनी मुंबईत परतली; ममताचा नवा लूक समोर
चाहत्यांची केले स्वागत; दिल्या शुभेच्छा
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-07 13:46:16

स्टारडस्ट या मासिकासाठी केलेले ८०-९० च्या दशकातील बोल्ड फोटोशूट, करण-अर्जुन, बाजी, चायना गेट, सब से बडा खिलाडी या चित्रपटांमधील तिच्या दिलखेचक नृत्य अदाकारीमुळे व त्यानंतर २०१५ मध्ये दोन हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी झालेले गंभीर आरोप, अशी ओळख म्हटले की, ममता कुलकर्णीच समोर येणार! ढासळती कारकीर्द, प्रियकरासोबतची वादग्रस्त रिलेशनशिप, संन्यास घेत अध्यात्माचा घेतलेला आधार, अशा अनेक चढउताराचा सामना करत ममता अखेर २५ वर्षांनी मायानगरी मुंबईत दाखल झाली आहे. सोशल मिडियावर .्व्हिडिओ अपलोड करत ५२ वर्षीय ममताने २५ वर्षांनी मायभूमीत परतलीय असे सांगितले. मुख्य म्हणजे इतकी वर्षे बॉलिवूडपासून दूर राहिलेल्या ममताचा हटके अंदाज समोर आला आहे. ममता तितक्याच मादक अंदाजात फोटोजमध्ये दिसल्यामुळे चाहत्यांनी खूप सुंदर सरप्राईज अशा कमेंट्स केल्या आहेत. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला क्लीन चिट देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली आहे. त्यानंतर ती आता मुंबईत परत आली आहे. मुंबईत परतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ममताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत. “मी विकी गोस्वामीशी लग्न केलेले नाही. मी अविवाहित आहे. मी कोणाशीही लग्न केलेले नाही. विकी व मी रिलेशनशिपमध्ये होतो, पण मी त्याला चार वर्षांपूर्वी ब्लॉक केले. मला त्याचे सत्य समजल्यावर मी त्याला सोडून दिले. तो दुबईच्या तुरुंगात होता. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केले. विकी २०१२ मध्ये तुरुंगातून बाहेर आला होता. मी त्याला २०१६ मध्ये भेटले होते. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. तो आता माझा भूतकाळ आहे. मी त्याला सोडून दिले असल्याचे ममताने सांगितले. दरम्यान, आयुष्याची दुसरी इनिंग ममता लवकरच सुरु करेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.