अमिताभ यांनी घेतले एक रुपया मानधन
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-07 14:01:41

महानायक अमिताभ हे कौन बनेगा करोडपतीच्या एका एपिसोडसाठी पाच कोटीपेक्षा जास्त मानधन घेतात. जेव्हा सन २००० मध्ये कौन बनेगा करोडपती सुरु झाले, तेव्हा त्यांचे मानधन होते फक्त २५ लाख. यावरूनच अमिताभ यांचा करिश्मा लक्षात येतो. मात्र याच अमिताभ बच्चन यांनी ‘मोहब्बतें’ या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया मानधन घेतलं होतं. तेव्हा खरं तर अमिताभ यांना पैशांची खूप चणचण भासत होती. तरीही रुपया मानधन घेतले होते. त्याचे कारणही तसेच होते. निर्माते निखिल अडवाणी यांनी एका मुलाखतीत सांगितले, की “माझ्या सिनेविश्वातील कारकिर्दीच्या काळात मी, सुरुवातीला ‘यशराज फिल्म्स’बरोबर काम करत होतो. त्यावेळी बच्चन यांना यश चोप्रा यांनी सिलसिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी मानधन म्हणून तुला किती पैसे हवेत, असं त्यांनी विचारलं. त्यावेळी अमिताभ यांनी मला एक घर खरेदी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला चांगली रक्कम द्या, असं बच्चन यांनी यश चोप्रा यांना सांगितलं.” निखिल अडवाणी यांनी पुढे सांगितलं, “काही वर्षांनी यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना ‘मोहब्बतें’साठी विचारलं. तसेच यावेळी पैसे किती घेणार हेदेखील विचारलं. मात्र, घर घेताना मागितली तेवढी रक्कम दिल्यानं आता मी फक्त एक रुपया घेणार, असं बच्चन यांनी म्हटलं.”