पवारांनी पाठवले मोदींना साहित्य संमेलन उद्घाटनासाठी पत्र

निमंत्रण स्वीकारले तर विज्ञान भवनात होणार उद्घाटन

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-13 13:03:49

नागपूर : दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण  स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.  पत्र पाठवून मोदी यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी पवार  निमंत्रित केले आहे.   पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले तर सुरक्षेच्या दृष्टीने संमेलनाचे उद्घाटन मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात करण्यात येणार आहे. 

३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, अशी सुचना मांडण्यात आली होती. आणि दुसरीकडे यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. स्वागताध्यक्षपदी असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनाला नेहरूंनी संबोधितही केले होते.  म्हणूनच मोदी यांना आमंत्रण पत्र देण्यात आले आहे. 

दरम्यान,  उद्घाटनासाठी पंतप्रधान  येणार असतील तर सुरक्षा व्यवथा,   संमेलनाच्या मंचावरील बैठक व्यवस्था यात बदल करावे लागणार आहेत. त्या अनुषंगाने संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करुन त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे.