संजीव कुमार, शत्रुघ्न होते सर्वांत आळशी कलाकार

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-13 13:14:16

जितका मोठा स्टार तितका तो सेटवर उशिरा येत असे. संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा हे सेटवर सर्वांत उशिरा पोहोचणारे आळशी कलाकार होते, तर शशी कपूर व अमिताभ बच्चन हे दोनच अभिनेते असे होते, जे वक्तशीर होते. अशी रंजक माहिती ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना एका मुलाखतीदरम्यान शेअर केली आहे. 
  शबाना यांनी सांगितले की, त्या काळात आम्ही १२ चित्रपटांत एकाच वेळी काम करत असू. त्या सगळ्यांच्या चित्रीकरणासाठी विविध ठिकाणी जावे लागत असे. जाण्या-येण्यासाठी गाड्यांचा ताफा तेव्हा आमच्यासाठी हजर नसायचा. त्यामुळे प्रवासात जास्त वेळ जायचा. तर,   मी तेव्हा  संजीव कुमार यांच्याबरोबर ‘नमकीन’ या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाचे शूटिंग फिल्म सिटीमध्ये सुरु होते. सकाळी सातला शिफ्ट सुरू व्हायची; पण संजीव कुमार कधीही साडेअकराच्या आधी सेटवर पोहोचले नाहीत. आई, मला सकाळी लवकर उठवत जाऊ नकोस. कारण हीरो स्वत: कधीही लवकर येत नाही, असे मी आईला सांगायचेदेखील, पण माझी आई स्वत: अभिनेत्री असल्याने व तिची पार्श्वभूमी थिएटरची असल्याने तिने मला सल्ला दिला होता. संजीव कुमार सेटवर किती वाजता पोहोचतात, याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू तुझ्या निर्मात्यांना वचन दिले आहेस आणि त्यामुळे जरी शूटिंग सुरू होत नसले तरी तू तिथे सातलाच पोहोचत जा. तर, संजीव कुमार साडेअकरालाच यायचे आणि त्यानंतर पाच-सहा शॉट झाल्यानंतर मी फिल्मीस्तानला जाण्यासाठी घाईत असायचे. तिथे २ ते १० शिफ्टमध्ये मी काम करायचे. शत्रुघ्न सिन्हा सातला यायचे. यांच्या तुलनेच राजेश खन्ना उत्तम होते. पण आता बॉलिवूड कलाकारांना शिस्तीचे महत्त्व, वेळेचे महत्त्व पटू लागलेय. तसे बदलही दिसताहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.