हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरण: अल्लू अर्जुनला अटक

३९ वर्षीय महिलेचा झाला होता मृत्यू

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-13 13:34:50

नवी दिल्ली :- हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी  तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे.  अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची आता चर्चा आणि उत्सुकता आहे. 

४ डिसेंबरला घडलेल्या या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे.चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि त्याची टीम संबंधित थिएटरवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येणार आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर कोणतेही गांभीर्य नव्हते तर ते हसत होते. अभिनेते, अन्य सेलिब्रेटी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ( संजय दत्त वगळता ) फारशी कठोर कारवाई आजवर पाहायला न मिळाल्याने याप्रकरणातही अल्लू अर्जुन सहीसलामत सुटतील अशी शक्यता प्रथम दर्शनी दिसते आहे.