लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल

प्रकृती स्थिर असल्याची सुत्रांची माहिती

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-14 13:22:42

नवी दिल्ली :- भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.  ९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले होते. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यातदेखील आडवाणी यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 आडवाणी यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुलैमध्ये त्यांना एम्स रुग्णालयात तर ऑगस्ट महिन्यात अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण आडवाणी यांना आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागत आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना याच वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे.  लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे नेते अशीही लालकृष्ण आडवाणी यांची ओळख आहे.