‘इट्स अ बेबी गर्ल’
राधिका आपटे झाली आई
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-16 15:01:38

पार्चड्, फोबिया, फॉरेन्सिक, मांझीसारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे.राधिकाने एका आठवड्यापूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राधिकाने तिच्या बाळाबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांशी ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर १२ वर्षांनी राधिका आई झाली आहे. दोन महिन्यापूर्वी एका बक्षीस वितरण सोहळ्यात तिने सर्वप्रथम गुडन्युज शेअर केली आहे. तसेच प्रसूतीनंतर ती कामावर परतल्याचेही तिने म्हटले आहे. राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तर तिच्या कुशीत तिची लेक आहे. तिने दिलेल्या कॅप्शनुसार तिचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे. लेकीच्या जन्मानंतर पहिली वर्क मीटिंग अशा आशयाचं कॅप्शन देत राधिकाने फोटो पोस्ट केला आहे. राधिकाने पोस्टच्या हॅशटॅगमध्ये ‘its a girl’ असं लिहिलं आहे. २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी राधिकाने लग्न केले होते. आता राधिका व बेनेडिक्ट दोघेही एका गोंडस बाळाचे आई-बाबा झाले आहेत.