देवोलिना बनली गोंडस मुलाची आई

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-19 13:01:32

साथ निभाना साथिया मालिकेपासून लोकप्रिय झालेली  लाडकी 'गोपी बहू' देवोलिना भट्टाचार्जी हिने १८  डिसेंबर रोजी  एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. देवोलिना आणि तिचा  पती शानवाज शेख यांनी त्यांच्या या चिमुकल्या पाहुण्याचे  स्वागत केले आहे. देवोलिनाने  एक छोटी  पोस्ट शेअर करून स्वतः ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी  तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

देवोलिना आणि शानवाज दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “१८ डिसेंबर २०२४.Arrivel of  Bundle Of Our Joy, आमच्या आनंदाचे आगमन…    बाळाचे आनंदित पालक…देवोलिना आणि शानवाज  .”  "हॅलो वर्ल्ड! हमारा नन्हा फरिश्ता ‘ लड़का ’ यहां है...18/12/2024 "

देवोलिनानं १५ ऑगस्ट रोजी आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती.  तिने   डिसेंबर २०२२ मध्ये जिम ट्रेनर शानवाज शेखसोबत लग्न केले. देवोलिनाने गरोदरपणातील फोटोशूट, डोहाळेजेवण, पंचामृत पुजा असे अनेक फोटोज शेअर केले होते.