लोखंडी रॉडने चटके : प्रायव्हेट पार्ट्समध्ये मिरची पावडर
मध्य प्रदेशमध्ये विवाहितेचा अमानुष छळ
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-21 16:02:36

राजगढ:- भारतात महिला रात्री रस्त्यांवर सुरक्षित नाहीत. मात्र त्या घरातही सुरक्षित नाहीत हे देखील मान्य करावे लागेल. मध्य प्रदेशमधील राजगढ येथील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी अत्यंत क्रूर पद्धतीने छळ करुन माणूसकीला काळिमा फासला आहे. या महिलेला तिच्या नवऱ्याने मारहाण केली. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली आणि लोखंडी रॉडने चटके दिले.
मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीविरोधात आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ डिसेंबरला घडली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला तिच्या पतीने, सासू सासऱ्यांनी आणि नणंदेने मारहाण केली. त्यानंतर तिचा लैंगिक छळ केला.
या महिलेने सांगितलं, “मला माझ्या सासरच्या लोकांनी निर्वस्त्र केलं. त्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मला लाथा मारण्यात आल्या तसेच ठोसेही लगावण्यात आले. तेवढ्यावरच माझा नवरा, सासू आणि नणंद, तसंच सासरे थांबले नाहीत. त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली आणि मला लोखंडी रॉडने चटके दिले. माझ्या सासूने मला लोखडी रॉडने चटके दिले. प्रायव्हेट पार्ट्सानाही चटके दिले. तर सासऱ्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या सासऱ्यांनी त्या महिलेला नंतर बाईकवर बसवलं आणि एके ठिकाणी सोडून दिलं. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. तिला एका माणसाने पाहिलं आणि ही महिला कोण आहे ते ओळखलं. तिच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर ही महिला कशीबशी तिच्या माहेरी पोहचू शकली. माहेरी गेल्यानंतर तिने आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर मध्य प्रदेशातील राजगढ या ठिकाणी पोलिसांत तक्रार करण्यात आली.