प्राजक्ता माळीचा विषय संपला: मी माफी मागणार नाही

सुरेश धस यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-30 17:46:54

मुंबई :- महिला कलाकारांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार सुरेश धस चांगलेच घेरले गेले. प्राजक्ता माळी यांनी तर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन धस यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मात्र सुरेश धस  हे प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला आहे. माझी विनंती आहे की कृपया याबाबत प्रश्न विचारु नका. मी माफी मागणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. 

जे काही होईल त्याला मी सामोरा जायला तयार आहे. माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. कृपया संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडचं जंगलराज, अतिभयंकर खून याचा फोकस दुसरीकडे डायव्हर्ट करु नका. बीड जिल्ह्यातली दादागिरी यावर बोला  असेही  सुरेश धस यांनी म्हटले आहे.  मी संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण वगैरे दिलेले नाही, देणारही नाही असेही सुरेश धस यांनी  स्पष्ट केले. 

बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट आज सुरेश धस यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी आका आणि आकाच्या आकावर आरोप केले आहेत. बीडमध्ये अग्निशस्त्राचे परवाने हे भाजीपाला वाटावा तसे दिले जात आहेत असा  आरोप सुरेश धस यांनी केला. अशा लोकांवर तातडीने कारवाई झाले पाहिजे  . १०५ परवाने रद्द करण्यात आले आहेत. १ हजार ५० परवाने यांचा आढावा घेऊन त्यातले अनावश्यक रद्द करु असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे असेही सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.