वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई होत नाहीये

जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर थेट आरोप

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-30 18:12:45

 बीड :- संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, त्याच्यावर मोक्का लावू असे सभागृहात सांगण्यात आले. मात्र  मात्र अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याचे सांगून जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.   तसेच तुम्ही तर थेट दाऊदला फरफटत अणणार होते. मग आता वाल्या कराडला आणायला का घाबरताहेत ? असे म्हणत  आव्हाड  यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेतल्याचे आव्हाड पुढे म्हणाले. 

 लोकं आज ना उद्या प्रकरण विसरून जातील. याचीच ते वाट पाहत आहेत असेही आव्हाड म्हणाले.  संतोष देशमुख हत्याप्रकरणी  ३०२ अन्वये  गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यात वाल्मिक कराडचे नाव नाही.  अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतली नाही असेही आव्हाड म्हणाले. उलट सभागृहात अजित पवार  सुरेश धस यांना डोळा डोळा म्हणत खुणवत होते असे आव्हाड म्हणाले. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही असे सांगून आव्हाड म्हणाले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर पवारसाहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते असे आव्हाड यांनी नमूद केले. 

दरम्यान, धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला पाठीशी घालत आहेत असा चहुबाजूंनी आरोप होत आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी पोलिस व सरकारावर जनतेने चांगलाच दबाव आणला आहे.   म्हणूनच वाल्मिक कराड शरण येणार असल्याचे बोलले जात आहे.