डाॅ.रामनाथ कोविंद यांनी घेतले त्र्यंबकेश्वर दर्शन
माजी राष्ट्रपतींकडून अभिषेक व पूजा
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-31 18:57:27

लोकनामा प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी आज ( मंगळवार दि.३१ डिसेंबर ) ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर इगतपुरी त्र्यंबकचे प्रांताधिकारी ओमप्रकाश पवार (आयएएस), तहसिलदार श्रीमती श्वेता संचेती, नगरपरिषदेचे निषाद सोनवणे यांनी डॉ. कोविंद व त्यांच्या परिवाराचे स्वागत केले. तर मंदिरात विश्वस्त कैलास घुले, विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रुपाली भुतडा यांनी मंदिरात स्वागत केले.
यावेळी मा. राष्ट्रपती महोदय व त्यांच्या परिवारातर्फे अभिषेक पूजा आरती करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य मनोज थेटे, विराज मुळे, मयुर थेटे आदींनी केले. पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.