वाल्मिक कराडांवर मोक्का लावा: अन्यथा महाराष्ट्र बंद पाडू

मनोज जरागेंचा सरकारला इशारा

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2025-01-01 16:06:12

 नांदेड:  संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत ते आता समोर येईलच.  या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे की नाही हे देखील सिद्ध होईल .   चौकशी सुरु होईल . काही आरोपी फरार आहेत .   मात्र  कोणी खंडणी मागितली आणि मागायला लावली, त्यासाठी कोणी फोन लावला? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी कोणी मदत केली? त्यांना कोणी सांभाळले, हे चौकशीतून समोर येईल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले असून  याप्रकरणात मोक्काचे 302 कलम लागेल. पण सरकारने तसं केलं नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

ते बुधवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबत चर्चा झाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे . त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत. वाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . कोण कोण मोठे मासे आहेत ते सापडतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत . पोलिसांनी शब्द दिलाय काही दिवसात अटक करु . नाही अटक झाली तर आम्ही आहोतच . सरकारने शब्द दिला , मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला , सगळ्यांना अटक करणार , शिक्षा करणार . या शब्दाला ते खरे नाही उतरले तर आम्ही रस्त्यावर येणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, हे आत्ताच म्हणता येणार नाही. राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतात हे बघू द्या. मग एकदा आम्ही सुसाट सुटलो तर सोडणार नाही.  फडणवीसांनी  शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

 धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा का त्याबद्दल मला माहीत नाही . मला एवढच माहिती आहे , या प्रकरणात जे जे येतील, मग मंत्री असो , आमदार असो की राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही, अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडणार . आरोपींनी कोणा कोणाला फोन केले, आरोपींना कोणी पळवून लावले, कोणी आसरा दिला . त्यावेळेस कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिले, यामध्ये कोण मंत्री आहे का , आमदार आहे का , सरकारमधील मंत्री आहे . सगळे कॉल डिटेल्स घेऊन तपास करावा . एखाद्याला न्याय देण्यासाठी , विरोधी पक्षातला असो का सत्ताधारी पक्षातला असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे . संदीप क्षीरसागर, खासदार, सुरेश धस बोलताहेत . यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . हे प्रकरण आम्ही कुठल्याच परिस्थितीत दबू देणार नाही . मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द पाळला नाही राज्य आम्ही बंद पडणार . 100% मराठे रस्त्यावर उतरणार, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.