सुनंदाताई गोसावी कलादालनाचे चित्रकार खैरनारांच्या हस्ते उद््‌घाटन

.........

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहाच्या प्रांगणात नव्याने सुरू होणाऱ्या सुनंदाताई गोसावी कलादालनाचे उद््‌घाटन सोमवारी (दि. २१) चित्रकार पंडित खैरनार यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव व प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, विश्वस्त डॉ. आर. पी. देशपांडे, सचिव डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. डॉ. कविता पाटील, प्रा. डॉ. नीलम बोकील, चित्रकला विभागप्रमुख प्रा. अर्चना सोनवणे आदी उपस्थित होते. 
आर्किटेक्ट प्रा. संजय पाबारी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी चित्रकार रामदास महाले, केशव मोरे, बाळकृष्ण नगरकर, प्रा. दिनकर जानमाळी, प्रा. संजय बागूल, शिल्पकार तेजस गर्गे, सुरेश भोईर, अशोक धिवरे, अनिल अभंगे, चित्रकार प्रफुल्ल सावंत, प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, प्रा. संध्या केळकर, मुक्ता बालिगा, प्रा. छाया खुळगे, प्रा. धनंजय गोवर्धने, प्राचार्य मुंजा नरवडे, आर्किटेक्ट वैशाली प्रधान, संजय पाटील, संजय बोरसे, अमोल चौधरी यांना महाविद्यालयाच्या चित्रकला विभागातर्फे गौरविले.

 अनिल अभंगे यांनी सत्कारार्थींतर्फे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रश्मी मंजिथाया, गार्गी देवधर, कविता प्रजापती, रोहिणी मैंद, नूपुरा जोशी, ऋतुजा पल्लवी हरदास, स्नेहल एकबोटे, शिवानी दीक्षित या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. चित्रकार खैरनार म्हणाले की, विद्यार्थिनींनी त्यांच्या पाच वर्षांच्या अध्ययन काळात चित्रकलेचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करावे. 
प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सांगितले की, सभागृहाच्या प्रांगणात असलेले हे कलादालन सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांनी युक्त आहे. नाशिकच्या बाहेरून येणाऱ्या कलावंतांची निवासव्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. 

कलेच्या विद्यार्थ्यांसाठी हे कलादालन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. डॉ. आश्लेषा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चित्रकला विभागप्रमुख प्रा. अर्चना सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.