ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

.........

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 0000-00-00 00:00:00

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे आज २४ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्या अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या. ‘सरस्वतीचंद्र’ (१९६८), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (१९७७) या हिंदी चित्रपटांमध्ये देव यांनी काम केले आहे. तर मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी रमेश देव यांच्या सोबत अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.