महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदानाची नोंद

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 14:10:01

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदानाची नोंद  


हे देखील वाचा

येवल्यात विकास, बेरजेचे राजकारण की चालणार आरक्षण ?

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-08-01 13:01:05

ज्ञानेश्वर बोऱ्हाडे : लोकनामा प्रतिनिधी

येवला :लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक सोपी कशी होणार यासाठी महायुती प्रमाणे महाविकास आघाडीत प्रयत्न सुरू आहेत.  येवला मतदार संघ हेवीवेट नेते मंत्री छगन भुजबळांचा असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. महायुतीकडून स्वतः श्री. भुजबळ असले तरी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) समोर त्यांना यावेळी थेट लढत होईल असे चित्र आहे. या लढतीत आतापर्यंत भुजबळांनी केलेले विकासाचे व बेरजेचे राजकारण वाचवणार की मराठा ओबीसी आरक्षण लढ्याचा फटका बसणार, याबाबत चर्चा केली जात आहे.

 

मंत्री श्री. भुजबळ येवल्याच्या विकासाचे बहुतांश प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्याला विशेष करून सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतील मित्र पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी देखील जुळून घ्यावं लागणार आहेत, त्यादृष्टीने श्री. भुजबळांनी स्वकियासह विरोधकांना आपलंस करण्यासाठी बेरजेच्या राजकारणावर अलीकडे भर दिला आहे. येवला विधानसभा मतदार संघात चार पंचवार्षिक पासून विद्यमान आमदार राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ प्रतिनिधित्व करतात. येवल्याचं मागासलेलं पण दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, रस्त्यांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर राहिले. शेती सिंचनसाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. येवला विधानसभा निवडणूकीची तयारी गेल्या काही महिन्यापासुन अनेक इच्छुक उमेदवारांनी सुरू केली आहे. स्वतःला भावी आमदार म्हणून पुढे आणण्यासाठी इच्छुकांच्या सोशल मीडिया टीम कार्यरत आहे. प्रभावशाली मुद्दे तपासून जनतेत जाण्याचे एकही क्षण ते चुकवत नसल्याचे चित्र आहे. विद्यमान आमदार राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ देखील यात मागे नाहीत, मंत्री श्री. भुजबळांनी नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत माजी आमदार मारोतराव पवार यांना बळ देत त्याच्या सून सविता बाळासाहेब पवार यांना सभापती पदासाठी पाठिंबा देत बेरजेचं राजकारण केले. माजी आमदार श्री. पवार यांचे पुतणे माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांना आपल्या मर्जीत ठेवण्यासाठी श्री. भुजबळ नेहमी आग्रही राहिले असून पवारांशी सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी ते प्रयत्नशिल असतात. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत भुजबळांना लक्ष करण्यासाठी स्थानिक विरोध मत परिवर्तन कसा होईल यासाठी मतदार संघात इच्छुकांच्या हालचाली गटीमान झाल्या आहेत.... एरवी सोशल मीडियावर मराठा आरक्षणाबाबत भुजबळांना होणारा विरोध कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कट्टर जरांगे समर्थक सचिन आहेर यांच्या जनसंवाद मेळाव्याने जाहिररीत्या प्रथमच प्रगट झाल्याने चर्चा रंगू लागली आहेत.

  मराठा आरक्षणाची ढाल.

 येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक प्रक्रिया दरम्यान माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार यांचे गटातील संचालक सचिन आहेर यांनी भुजबळांच्या पाठिंब्याला विरोध दर्शवित निवडणूकीपासून अलिप्त राहिले, श्री. आहेर मराठा आंदोलनात सक्रिय असून ते मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याकडे भावी उमेदवार म्हणून देखील पाहिले जात आहे. त्यांनी काल जनसंवाद मेळावा घेऊन मित्र परिवाराकडून मते जाणून घेतली त्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी एकूणच भुजबळ विरोधी भूमिकेला मिळालेली नांदी आगामी काळात उत्सुकतेचा विषय ठरले यात नवल नाही.

पवार नावाची भीती

आगामी विधानसभा निवडणूक महायुती आणि आघाडीत होणार असली तरी येवल्याचं राजकारण पवार नावा भोवतीच फिरणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचा येवला विधानसभा मतदार संघ हक्काचा असून उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार या दोन्ही गटात सरळ लढत होईल अशी परिस्थिती आहे.  महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भुजबळ उमेदवार असले तरी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यात श्री. शरदचंद्र पवार यांचे व्यक्तीशा येथिल नेत्यांशी जवळीक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या येवल्यातील जाहीर सभेत माजी आमदार मारोतराव पवार, जेष्ठ नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यामुळे आगामी काळातील शरद पवार यांच्या निर्णयानुसार येवल्याचं राजकारण फिरणार आहे.  पवारांना मानणार मोठा गट येवल्यात असून एक उमेदवार जाहीर केल्यानंतर इतरांना थांबवण्याची ताकद त्यांच्या शब्दात असल्याचे येवलेकर जाणून आहेत.

शिंदेचा गनिमिकावा

 मंत्री भुजबळांनी येवल्यातून निवडणूक लढवावी यासाठी २००४ मध्ये आग्रही भूमिका घेणारे जिल्हा बँकचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे आज त्याच्या विरोधात आहे. एकूणच त्यांनी येवला मतदार संघ सोडावा ही जाहीर भूमिका घेणारे देखील शिंदेच आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकाहाती प्रचाराची धुरा सांभाळून शिंदेनीा खासदार भगरे यांना मतांची येवल्यातून मोठी आघाडी दिली.  त्यामुळे त्याचेदेखील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याचा गनिमीकावा महत्वाची भूमिका घेईल.

दराडेची भूमिका

 एकीकडे मराठा आरक्षणाचा विधानसभेत डोकेदुखी ठरणारा विषय भुजबळांना येवल्यातील माधवगट (माळी, धनगर आणि वंजारी ) एकगठ्ठा ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते कुणाल दराडे गेल्या काही वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यात आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांची मतदारापर्यंत पोहचण्याची कला सर्वश्रुत आहे त्यात ते थांबणार नाहीत. अशा परिस्थितीत ते कोणाकडून निवडणूक लढवतील यावर देखील मतदार संघाचे आगामी राजकारण बदलणार आहेत.

विकासाची जादू चालणार का?

 येवला विधानसभा मतदार संघात मंत्री भुजबळ यांचे येवला व विंचूर या दोन ठिकाणी संपर्क कार्यालय आहेत. मात्र, काहीशा तक्रारीमुळे येवला मतदार संघाचा कारभार भुजबळांनी आपले अत्यंत निकटवर्ती विश्वासू समता परिषदचे नेते दिलीप खैरे यांना येवल्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे खैरेनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाना बरोबरच तालुक्यातील जिव्हाळाचा मांजरपाडा प्रकल्प कामाची मोठया आपुलकीने सोडवणूक करण्यासाठी जीवाचे रान केले आहे.. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याद्वारे पाणी तालुक्यात फिरविण्यासाठी त्यांची विकासाभिमुख कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यासोबत आहे.  प्रतिकूल परिस्थितीत मांजरपाडाचे पाणी या पावसाळ्यात येवल्यात आणून दिलेला शब्द पूर्ण करण्यावर भुजबळांचा भर आहे.